पुणे दि.५ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
लोणावळा येथील सुप्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते पंकज जयस्वाल यांना पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाकडून साहित्य, सृजन, शिक्षण व सेवा कार्यासाठी मानद विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) पदवीने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये हा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला.
डॉ.पंकज जयस्वाल हे उत्तम लेखक असून त्यांनी ५ पुस्तके लिहिली आहेत तर तब्बल ९११ इंग्रजी,हिंदी,मराठी लेख शोध पत्रासह वृत्तपत्रासह विविध ठिकाणी प्रकाशित झाले आहेत यासोबतच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही जयस्वाल यांचे कार्य आहे.
त्यांच्या या मानद विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) सन्मानाबद्दल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
