मुंबई दि.२४ (सिटीनामा वृत्तसेवा)
महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात मंगळवारी भाजपा पक्षाच्या राज्य पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. नवनियुक्त राज्य पदाधिकाऱ्यात १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १२ चिटणीस, कोषाध्यक्ष, सह कोषाध्यक्ष, मुख्यालय प्रभारी, सह प्रभारी, मुख्य प्रवक्ता यांचेसह विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. जम्बो कार्यकारिणीत राज्यातील विविध भागातील नेतृत्वांना संधी दिल्या गेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय संघटन मंत्री बी. एल.संतोष, सहसंघटन मंत्री शिव प्रकाश यांचे मार्गदर्शनात भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व वरिष्ठ भाजपा नेत्यांसोबत चर्चा करून नियुक्त्या जाहीर केल्याचे सांगितले.
भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक या तरुण, सोशल मिडियावरील प्रसिद्ध चेहऱ्याला संधी दिली आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी आमदार चित्रा वाघ , कोषाध्यक्षपदी आ.मिहिर कोटेचा, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी आ.योगेश टिळेकर तसेच भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तपदी नवनाथ बन यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
नवी कार्यकारिणी –
प्रदेश उपाध्यक्ष
अतुल काळसेकर
भारती पवार
संजय कोरगे
संजय भेंडे
रामदास कडस
केशव उपाध्ये
गोपीचंद पडळकर
प्रिया शिंदे
सुजय विखे पाटील
अर्चना पाटील चाकूरकर
सरचिटणीस
निरंजन डावखरे
संजय कुटे
माधवी नाईक
राजेश पांडे
सुनिल राणे
योगेश सागर
चिटणीस
मंगेश चव्हाण
संजय कुटे
परिणय फुके
वर्षा डहाळे
संजय जगताप
अर्चना डेहणकर
रोहिणी नायडू
राम सातपुते
प्रविण घुगे
रेखा कुलकर्णी
भैरवी घाक
यांची निवड करण्यात आली आहे.
