पुणे दि.५ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुणे येथील डॉ.संगीता पांडे यांना पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुरा यांचे वतीने मानद विद्यावाचस्पती(डॉक्टरेट)या पदवीने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली. या सन्मानाबद्दल त्यांचे शैक्षणिक वर्तुळातून कौतुक होत आहे.
