हिंदू एकतेच्या आड येणाऱ्या प्रवृत्तींना रोखा – मिलिंद एकबोटे

Share this News

पिंपळे निलख दि.२७ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)

जातीपातीत विष कालवणाऱ्यांना आपण वेळीच ओळखून हिंदू एकतेचा आड येणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे, आता सर्व हिंदूसमभाव आवश्यक असल्याचे रोखठोक प्रतिपादन प्रखर वक्ते, धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले ते पिंपळे निलख ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सकल हिंदू संमेलनात बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी मंदिरात दत्तप्रभूंच्या आरतीने झाली. ढोल-ताशांच्या गजरात नगर प्रदक्षिणा करण्यात आली. दीपप्रज्वलन व गणेशवंदनेने कार्यक्रमाची आकर्षक सुरुवात झाली. यानंतर भरतनाट्यम नृत्य सादर करण्यात आले.

राजू गोसावी यांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ८० विद्यार्थ्यांच्या सहभागातून लाठी-काठीचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले.
प्रबोधनकार डॉ. यशवंत साखरे महाराज यांनी हिंदू संघटनशक्ती, सज्जनशक्ती आणि संघशक्ती जागृत होणे आवश्यक असल्याचे सांगून सर्वांनी संघटित होण्याचे आवाहन केले.

यानंतर मिलिंद एकबोटे यांनी हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत नवीन वर्षात भारतमातेची सेवा प्रत्येकाकडून घडावी, अशी प्रार्थना व्यक्त केली. प्रत्येकामध्ये नरेंद्रांसारखे नेतृत्वगुण विकसित व्हावेत असे सांगून परमपूजनीय आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांना प्रेरणास्थान मानून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आज संघकार्य देशभर पोहोचले आहे. जिथे जिथे स्वयंसेवक पोहोचला, तिथे संघकार्य वाढले आहे. अनेक देशांतही संघकार्य सुरू आहे.

हिंदू समाजासाठी इतिहास हे स्फूर्तीस्थान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे ईश्वरकार्य आहे. स्वामी विवेकानंद स्मारकाची उभारणी याच कार्यातून झाली, याचा उल्लेख करण्यात आला. हिंदूंनी परस्पर संपर्क वाढवून पंचसूत्रीचा अवलंब करावा, असे सांगितले.

कोरोना काळात भारताने गरीब देशांना लस उपलब्ध करून दिली, याचा उल्लेख करत ज्ञानेश्वरी व पसायदानची आठवण करून देण्यात आली. हिंदूंमध्ये बंधुप्रेम व एकात्मतेची भावना निर्माण होणे आवश्यक असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

सर्व जाती-पाती विसरून हिंदूंनी भावबंधुत्वाने राहावे, हिंदू धर्मभाव ही संकल्पना दृढ व्हावी, असा सकल हिंदू संमेलनाचा सूर होता.

सौ. प्रियाताई काटे यांनी धर्मपालनाचे महत्त्व सांगून आद्यग्रंथांचे अध्ययन व त्यानुसार आचरण करण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून देताना सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा उल्लेख करण्यात आला — “आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे” आणि “गड आला पण सिंह गेला”. त्यानंतर कोंढाणा गडाचे सिंहगड असे नामकरण झाल्याची माहिती देऊन संतांचे आचरण व धर्माचे आचरण जीवनात आणण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आदिती धनंजय खोंड व सौ. बोटे ताई यांनी केले.

कार्यक्रमात समितीचे संयोजक संतोष तात्या, राजेंद्र टकले, सचिन साठे, भरत इंगवले, माउली मुरकुटे, जगदाळे, जयवंत रानवडे, शिवाजी टाक, सुरेश बापू तात्या साठे, सचिन साठे, संकेत चोंधे नितीन इंगवले, स्नेहा कलाटे यांचेसह अनेकविध मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी भारत इंगवले यांनी आभार प्रदर्शन केले. सर्व उपस्थितांनी हिंदूजन जागृती व हिंदू धर्मपालनाची प्रतिज्ञा घेतली. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *