आळंदी / पुणे दि.२१ (सिटीनामा वृत्तसेवा)
सात मावळे संवर्धन संस्थेतर्फे रविवार दि.२२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पासून श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील पवित्र इंद्रायणी घाटावर इंद्रायणी स्वच्छता व संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
‘चला इंद्रायणीच्या भेटीस..’या मोहिमेअंतर्गत घाट स्वच्छता करण्यात येणार असून पवित्र इंद्रायणीचे पावित्र्य कायम ठेवण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू असल्याचे सात मावळे संवर्धन संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.
या अभियानासाठी पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रविदादा लांडगे, आय टी दिंडी,छत्रपती शिव शंभू संघ,गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान,शिववंदना मित्र परिवार धायरी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आळंदी नगर परिषद यांचे विशेष सहकार्य लाभत असून जास्तीत जास्त इंद्रायणीनदी,पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सात मावळे संवर्धन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

