राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा बदलल्या ; ‘ या ‘ तारखेला होणार मतदान…

Share this News

दि.२९ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती दुदैवी निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाल्यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्रात २८ जानेवारी २०२६ पासून ३० जानेवारी २०२६ पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील.
त्यानुसार येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. या सुधारित वेळापत्रकानुसार संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.या निवडणुका पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांमध्ये होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *