पुणे दि.२० (सिटीनामा वृत्तसेवा)
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे शनिवार दि. २१ फेब्रुवारी ते सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सकाळी १०.०० ते रात्री ०८.०० या कालावधीत संस्थेमध्ये ‘ज्ञानसागर:’ हे एक विशेष प्रदर्शन भरवण्यात येत आहे.
या प्रदर्शनामध्ये युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली व संस्थेच्या हस्तलिखित विभागातील प्राचीन हस्तलिखिते, शास्त्रीय ग्रंथांवर आधारित वैज्ञानिक उपकरणे, संस्थेची प्रकाशने तसेच संस्थेने सुरु केलेले विविध संशोधनाचे प्रकल्प, इत्यादिंची माहिती मिळणार आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून हे प्रदर्शन विनामूल्य असल्याचे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
१०८ वर्षे झालेल्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेने संशोधनाचा वसा घेतला आहे, या ठिकाणी विविध विषयांवर अविरत संशोधन सुरु असते. संस्थेमध्ये सुरु असणाऱ्या या संशोधनाचा “याचि देही” प्रत्यय घेण्याची संधी संस्थेनेच उपलब्ध करून दिली आहे, इतिहास, हस्तलिखिते प्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
स्थळ – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, ८१२, चिपळूणकर रस्ता (लॉ कॉलेज रोड), शिवाजीनगर, पुणे – ०४
दिनांक- दि. २१ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारी २०२६
प्रदर्शनाची वेळ- सकाळी १०.०० ते रात्री ०८.००
