सुनेत्रा अजित पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री

Share this News

-राजभवनात शपथविधी संपन्न

मुंबई दि.३१ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)

लोकनेते अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी आज मुंबई येथील लोकभवनातील दरबार सभागृहात सायंकाळी ५ वाजता दरम्यान उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीमुळे राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत.

आज सकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती व तसे पत्र माननीय राज्यपाल महोदयांना देण्यात आले होते त्यानंतर राजभवनात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी यांच्या उपस्थितीत राज्याचे माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवारांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या प्रसंगी ‘अजितदादा अमर रहे ‘ या घोषणा देण्यात आल्या. अतिशय साधेपणाने भावूक वातावरणात शपथविधी संपन्न झाला. राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार बारामतीला रवाना झाल्या असून स्व.अजितदादांच्या दशक्रिया विधी होईपर्यंत त्या बारामतीतच राहणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *