सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री?

Share this News

राज्याला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

 दि.३० जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा) राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्व.अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार स्वीकारणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आज वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते यावेळी त्यांची बैठक होऊन उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
शनिवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात येणार असून त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर त्या ठिकाणी देखील शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
स्व.अजितदादा पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्याची माहिती आहे.
सुनेत्रा पवार या दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या पत्नी असून सध्या त्या राज्यसभेच्या विद्यमान खासदार सुद्धा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *