भारत विश्वविजेता!!                              १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा दैदिप्यमान विजय

Share this News

(सिटीनामा क्रीडावृत्त)
१९ वर्षाखालील आयसीआयसी पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने इंग्लंडवर शानदार विजय मिळवत १९ वर्षाखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. सहा फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी इंग्लंड संघावर तब्बल १०० धावांनी विजय मिळवत एक नवा विक्रम आपल्या नावाने प्रस्थापित केला आहे.
कर्णधार आयुष मात्रेच्या नेतृत्वात ९ बाद ४११ धावांचा डोंगर उभारत प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाला ५० षटकात ३११ धावातच गारद केले. भारताकडून वैभव सूर्यवंशी ने ८० चेंडू मध्ये १७५ धावांची अप्रतिम कामगिरी करत भारताला मोठ्या धावसंख्या उभी करण्यात मोलाची कामगिरी केली तर इंग्लंड कडून कॅलेब फाल्कनर यांनी ६७ चेंडू मध्ये ११५ धावा करत सामन्यात चुरस निर्माण केली मात्र इंग्लंड संघ विजयापर्यंत पोहोचू शकला नाही व भारतीय संघाने सहाव्यांदा हा विजय संपादन केला.
या विजयाबद्दल संपूर्ण देशात आनंदाचा वातावरण असून १९ वर्षाखालील क्रिकेट टीमवर संपूर्ण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *