पारदर्शी कारभारासाठी, मराठीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी साहित्य संवर्धन आघाडीला वाढता पाठिंबा..!

Share this News

-महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक २०२६
पुणे दि.७ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
साहित्य संस्थांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेची निवडणूक होत असून या निवडणुकीत विद्यमान कार्यकारिणी विरोधात साहित्य संवर्धन आघाडीतर्फे उमेदवार रिंगणात असून साहित्य संवर्धन आघाडीला जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना त्यांच्या निवासी पत्त्यावर टपालाने मतपत्रिका ६ फेब्रुवारीपासून मिळण्यास प्रारंभ झाला आहे. १२ मार्च २०२६ पूर्वी या मतपत्रिका महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पत्त्यावर टपालाने पाठवावी वा प्रत्यक्ष नेऊन द्यावी लागणार आहे. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी सर्व मतदार मतदान करू शकणार आहे तर अन्य सात उमेदवारांना फक्त पुणे शहर हद्दीतील मतदार मतदान करू शकणार आहेत.
या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीतर्फे अभ्यासू व अनुभवी साहित्यिक मान्यवरांना उमदेवारी दिली आहे. साहित्य सम्राट न. चिं. केळकर,
लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र साहित्य परिषदेची निर्मिती झाली. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या संस्थेचा कारभार अधिक लोकाभिमुख आणि मराठी
साहित्य विश्वाच्या उत्कर्षासाठी झाला पाहिजे, या प्रामाणिक भावनेतून ‘साहित्य संवर्धन आघाडी’ या निवडणुकीच्या
रिंगणात उतरलेली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिचा योग्य सन्मान झालेला आहेच, आता पुढील जबाबदारी मतदारांची असून साहित्य परिषदेत सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या विचारातून या निवडणुकीत उतरलेलो असल्याचे साहित्य संवर्धन आघाडीतर्फे अध्यक्षपदाचे उमेदवार जेष्ठ सिनेअभिनेते, सुप्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांनी बोलतांना सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक दहा वर्षानंतर होत आहे. या निवडणुकीत पारदर्शी कारभारासाठी, मराठीजनांच्या व मराठीच्या उज्वल भवितव्यासाठी साहित्य संवर्धन आघाडीतर्फे खालील उमेदवार रिंगणात असून या सर्वांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेते, लेखक, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ संचालक, स्नेह पुणे चे अध्यक्ष, चित्रपट अनुदान समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य असलेले योगेश सोमण प्रमुख कार्यवाह पदासाठी डॉ.स्वाती महाळंक, कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर, कार्यवाह पदासाठी सुनील महाजन, सुनेत्रा रवींद्र मंकणी, प्रकाश मिरासदार, प्रा.डॉ. गणेश राऊत,डॉ.नितीन संगमनेरकर,आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे तर पुणे जिल्हा कार्यवाहपदासाठी  संदीप भानुदास तापकीर निवडणुकीच्या रिंगणात असून संदीप तापकीर विश्वकर्मा पब्लिकेशनमध्ये संपादक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी १०० हून अधिक पुस्तकांचे संपादन केले असून १४ वर्षात ४०० हून अधिक लेखकांना लिहिते केले आहे तर २० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष असलेल्या संदीप तापकीर यांना छत्रपती श्री शिवराय हे शिवचरित्र मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये प्रकाशित हिंदी अनुवादाला महाराष्ट्र साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *