दासबोध अभ्यास मंडळातर्फे दासनवमी उत्सवाचे आयोजन

Share this News

चिंचवड दि.९ (सिटीनामा वृत्तसेवा)
येथील दासबोध अभ्यास मंडळ चिंचवड यांच्यातर्फे श्रीरामदास नवमी उत्सव २०२६ निमित्याने विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन माघ वद्य नवमी बुधवार दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी काशिधाम मंगल कार्यालय चिंचवड येथे करण्यात आले आहे.
सकाळी ६ वाजता काकडा आरती, ७ वाजता श्री समर्थ पूजन, सकाळी ९ वाजता डॉ.सौ. माधवीताई महाजन यांचे श्री समर्थ शिष्य उद्धवस्वामी या विषयावर प्रवचन होणार आहे. सकाळी १०.१५ वाजता सौ.सीमाताई इनामदार यांचे प्रवचन होईल. दुपारी महाप्रसादानंतर डॉ. उपेंद्रजी बेल्हे साधकांशी संवाद करतील त्यानंतर दुपारी २.४५ वाजता डॉ.माधवीताई कळमकर यांचे चौपदी विषयावर प्रवचन, दुपारी ४ वाजता श्रीमती विनयाताई कोल्हटकर यांचे कीर्तन, सायंकाळी ६ वाजता सायंउपासना व त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार असून समर्थभक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन दासबोध अभ्यास मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *