संघटित हिंदू एकतेतूनच सामर्थ्यशाली भारत – हेमंत हरहरे

Share this News

वाकड दि.२३ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण भारतासाठी हिंदू एकता अनिवार्य असून संघटित हिंदू एकतेतूनच सामर्थ्यशाली भारत उभा होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी केले ते वाकड येथील विराट हिंदू संमेलनात बोलत होते. भारताचा गौरवशाली इतिहास कायम सर्वांना प्रेरणा देतो. आपण सर्वांनी जातीपाती बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र येणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सध्या हिंदू समाजामध्ये अनेक प्रश्न असून या सर्वांवर मात करण्यासाठी हिंदू एकता अनिवार्य आहे. अनेक संस्कारी कुटुंबामुळे उत्तम समाज बनतो आणि मग हे मजबूत राष्ट्र उभे राहते. पर्यावरण संरक्षण ही काळाची असून आपण प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी पाऊले उचलणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकल हिंदू समाज व हिंदू नव वर्ष स्वागत समिती तर्फे, शोनेस्ट टावर राम मंदिर येथे हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी मुख्य अथिती म्हणून हरहरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर संमेलनाचे अध्यक्ष बाळासाहेब कुटे व उपाध्यक्ष शिवाजी कोंडीबा ढेबे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वाकड कलामंचातील सदस्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाने झाली

त्यानंतर राम मंदिर येथे वाकड मधे गुढीपाडव्या निमित्त वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या शोभायात्रांचे एकत्रीकरण होऊन मान्यवरांच्या उपस्थिती मधे श्रीरामाची आरती करण्यात आली. सदर शोभा यात्रांमध्ये वारकरी मंडळांकडून पारंपारिक नृत्य करण्यात आले तसेच ढोल ताश्यांच्या गजरात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला.

नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवाजी महाराज आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

त्यानंतर ज्ञानदेव येरनाळकर यांनी गणेशवंदनेचे सादरीकरण केले

या हिंदू संमेलनास चिंचवड विधानसभा आमदार शंकरभाऊ जगताप उपस्थित होते. मनपा वार्ड क्रमांक २५ व २६ मधील भाजपा चे विद्यमान नगरसेवक सौ. श्रुतीताई राम वाकडकर, कुणाल वाव्हळकर, राहुल कलाटे, विनायक दादा गायकवाड आणि सौ. स्नेहा रणजीत कलाटे हे उपस्थित होते.

तसेच नगरातील लहान मुलांकडून राम स्तुती व तराणा सादर करण्यात आले. ह्या संमेलनाचे सूत्रसंचालन हे सौ. अबोली मांडे व वाल्मिक मांडवडे यांनी केले.

या हिंदू संमेलनास साधारण २ हजार नागरिक उपस्थित होते तसेच नगरातील अनेक मान्यवर राम वाकडकर, रणजित आबा कलाटे, किरण पानवलकर, प्रणय गांधी, निलेश खेर्डीकर, गौरव पाटील, पंकज ओझा, अनिकेत देशमुख, शैलेश औसेकर, शुभम घाटकर, निरंजन घाटकर, विवेक देवरणकर यांच्या सोबत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपथीत होते.

सदर हिंदू संमेलनाच्या ठिकाणी जनजाती कल्याण आश्रम, भारत विचार साधना, पर्यावरण संवर्धन गतिविधी यांनी देखील माहिती केंद्र लाऊन सहभाग घेतला. सदर ठिकाणी सुनील सावरबांधे , गंगाधर रेड्डी, प्रसाद दीक्षित, सुनीत सिंग, सुमंत देशपांडे, उदय गणेशवाडी, गणपत शेवाळकर, संभाजी बुचडे, प्रसन्न अग्निहोत्री, वसंत देशमुख, सुरेश पांडे, प्रशांत पांडव आदी मंडळी उपस्थित होती. तसेच नगरातील अनेक गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन अध्यक्ष बाळासाहेब कुटे यांनी केले त्या नंतर सामूहिक वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *