पिंपरी दि.९ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
हिंदू संघटित असेल तर केवळ देशच नव्हे तर संपूर्ण जग सुरक्षित राहू शकते. आपण आपली संस्कृती, धर्म कर्तव्य विसरल्यानेच आपल्यावर अनेक आक्रमकांनी आघात केले. आपल्या धर्माबाबत अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते मात्र आता कुठल्याही बुद्धीभेदाला बळी न पडता हिंदूंनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन प्रसिद्ध वक्ते, शिवशंभू विचार मंचाचे ज्ञानेश्वर पठाडे यांनी केले ते बालमन चाळ म्हाडा वस्ती, पिंपरी मध्ये आयोजित भव्य हिंदू संमेलनात बोलत होते.

कु.नियती खराडे हिच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली
ह.भ.प.पोपट महाराज इंगळे यांनी आशिर्वचनात बोलतांना सांगितले की, आपण भाग्यवान आहोत की आपण भारत देशात जन्माला आलो जिथे महान संस्कृती आहे, आपण आपल्या महान संत साहित्याचा अभ्यास केला पाहिजे, सगळ्या समस्यांची उत्तरे ज्ञानेश्वरी,अभंग गाथेत आहेत, अनेक क्रांतिकारकांचे आपल्यावर कर्ज आहे या कर्जातुन मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, महाराष्ट्रात जेवढे संत जन्माला आले तितके अन्य कुठेही नाही, धर्माने घालून दिलेल्या नियमाने चालले पाहिजे, जाती भेद न करता सर्वांना घेऊन चालले पाहिजे, पर्यावरणयुक्त समाज निर्माण केला पाहिजे, धर्म, संस्कृती आपल्या घरापासून सुरु केली पाहिजे, श्रीरामाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. संस्कार जतन करण्याचे काम आपण केले पाहिजे. उपस्थितांना संबोधित करताना पठाडे पुढे बोलतांना म्हणाले, जातपात विसरून हिंदू संघटन झाल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, हिंदूचे संघटन झाल्याने अफजलखान, औरंगजेब यांच्यावर मात केली, उज्वल भविष्यासाठी हिंदूचे संघटन गरजेचे आहे, हिंदूचे संघटन यासाठी गरजेचे आहे की त्यामुळे स्व बोध होतो, हिंदू संघटन सु शासनासाठी गरजेचे आहे, त्यासाठी जाती भेद मिटवुन एक येणे गरजेचे आहे, जाती भेदाचे निर्मुलन होणे गरजेचे आहे, जाती भेद आपल्यावर थोपवला गेला, जाती जन्माने नाही तर वर्णाने आल्या, इस्लाम हा भारतातला धर्म नाही, त्यांनी आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, इंग्रजांनी जाती भेद रुजवला, हिंदू एकत्र का येत नाही कारण बुद्धीभेद केला जातो, आपल्याला जागे होण्याची वेळ आहे, बाहेर लव्ह जिहाद चाललाय आपण गंभीरपणे घेण्याची वेळ आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराज सेक्युलर होते हे सांगितले जाते, पण ते कधीच सेक्युलर नव्हते, हिंदू संघटन न होण्याचे दुसरे कारण अहंकार आणि फितुरी आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराज तुमच्या आमच्या नसानसात आहेत.
हिंदू एकत्र न येण्याचे कारण आपल्या संस्कृती आणि परंपरा बद्दलची अनास्था हे आहे, हिंदू संघटित झाल्याने राम मंदिर निर्माण झाले, तुमच्या मनात चुकीच्या गोष्टी सांगुन गोंधळ निर्माण केला जातो, आपण आपली संस्कृती विसरल्याने आपण अनाथ झालो, आपण सर्वशक्तीमान आहोत पण आपली संस्कृती विसरलो आहोत, हे परत मिळवण्यासाठी हिंदूचे संघटन गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निरपेक्ष वृत्तीने समाजाचे काम करतो, पुढची पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदूचे संघटन होणे गरजेचे आहे, त्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला परिसरातील सकल हिंदू भगिनी बांधव तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
