विद्यार्थी विज्ञान मंथन: आंतरराष्ट्रीय परीक्षेत पुण्यातील विद्यार्थी ठरले हिमालयन विजेते

Share this News

पुणे दि.२७ मे (सिटीनामा वृत्तसेवा)

गुजरात मधील आय. आय. टी. गांधीनगर येथे झालेल्या विद्यार्थी विज्ञान मंथन या आंतरराष्ट्रीय स्तरांमधील परीक्षेच्या यावर्षीच्या अंतिम फेरीत, भारतातील पश्चिम विभागातून (महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा) पुण्यातील तीन विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावून पुण्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक लौकिकात मानाचा तुरा खोवला.
दि.१६ व १७ मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध राज्यातून ५०० हुन अधिक विद्यार्थी तर पश्चिम महाराष्ट्र विभागातून १२ विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी निवड झाली होती हे विशेष.

सदर परीक्षेत ईशान ओझा इयत्ता ७ वी एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल चिंचवड पुणे याने पहिले तर अनीव साहू इयत्ता ६ वी विखे पाटील मेमोरियल स्कूल पुणे याने दुसरे पारितोषिक मिळवले. परीक्षेतील गुणांप्रमाणे या दोन्हीही विद्यार्थ्यांना हिमालय विजेते असे मानांकन मिळाले. विविक्ता आय्यर इयत्ता ११ वी झोनल विनर ठरली.
विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाच्या स्वरूपात वर्षभर शिष्यवृत्ती प्राप्त होणार असून यांना प्रशस्तीपत्र , सन्मान चिन्ह मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात भोपाळ येथील आयसर या संशोधन संस्थेत सृजन कार्यक्रमा अंतर्गत सात दिवसांचे प्रशिक्षणाची व इशान ओझा आणि अनीव साहू याना वर्षभर भारतातील शास्त्रज्ञांसोबत प्रकल्प करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना महिना २०००/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शेखर मांडे यांचे उपस्थितीत, आय. आय. टी. गांधीनगरचे डायरेक्टर डॉ. रजत मुना, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. शिवकुमार शर्मा डॉ. अरविंद रानडे -निदेशक एन. आय. एफ. यांच्या हस्ते विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.
पुण्यातील समन्वयक मीना माळगावकर, किरण बडवे आणि डॉ. कीर्ती लिमगावकर यांनी या सर्व मुलांना वेळोवेळी परीक्षेसाठी मार्गदर्शन केले.

काय आहे विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा?

विज्ञान आणि तंत्रज्ञान हे समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून विज्ञान भारती संपूर्ण देशभरात कार्य करते. विज्ञान भारती तर्फे विज्ञानाच्या प्रसारासाठी अनेक उपक्रम राबवले जातात त्यापैकीच शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विज्ञान मंथन हि परीक्षा घेतली जाते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे समाजातील सर्वस्तरातील लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने विज्ञान भारती संपूर्ण देशभरात कार्य करते. विज्ञान भारती तर्फे विज्ञानाच्या प्रसारासाठी अनेक उपक्रम राबवले जातात त्यापैकीच शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विज्ञान मंथन हि परीक्षा घेतली जाते. भारतीय शास्त्रज्ञांचे चरित्र, भारताचे विज्ञान विषयक योगदान यांचाही अभ्यासक्रमात समावेश, इंग्रजीसह ११ भारतीय भाषेमध्ये परीक्षेची सुविधा आणि विविध नावाजलेल्या शास्त्रज्ञ आणि संशोधन संस्थांमध्ये संवादाच्या संधी या अशा अनेक वैशिष्ट्यामुळे विद्यार्थी विज्ञान मंथन उपक्रमाला अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले आहे. इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा देता येते. यावर्षीचे या परीक्षेची नावनोंदणीस सुरुवात झाली आहे.

या परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी vvm.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन विज्ञान भारती तर्फे करण्यात आले आहे.

(हिमालय विजेते ईशान ओझा,अनीव साहू झोनल विजेती विविक्ता आय्यर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *