दि.२३ जानेवारी रोजी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील या भागातील शाळा असतील बंद….

Share this News

पुणे दि.२१ (सिटीनामा वृत्तसेवा) पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही UCI मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा दि.१९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली असल्याने शुक्रवार दि.२३ जानेवारी रोजी सदर स्पर्धेचा टप्पा ४ छत्रपती शिवाजी स्टेडियम बालेवाडी येथून सुरू होऊन पुणे शहर हद्दीत जाऊन परत राजीव गांधी ब्रीज मार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत राजीव गांधी ब्रीज येथून प्रवेश केल्यानंतर ती सांगवी, वाकड, निगडी, त्रिवेणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी काळेवाडी परिसरातून फिरून परत राजीव गांधी ब्रीज मार्गे पुणे शहर हद्दीत जाणार आहे.
सदर स्पर्धा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) व युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (UCI) यांनी निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार आयोजित करण्यात आली आहे.                             .       – या भागातील शाळा असतील दुपारी १२ नंतर बंद –
दि.२३ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या पुणे ग्रँड टूर २०२६ टप्पा ४ ची स्पर्धा होत आहे.
सदरची स्पर्धा सुरळीतपणे व सुरक्षित होण्याकरिता तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता सदर मार्गावरील वाहतूक दि.२३ रोजी पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरिता स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत,ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणी नगर, चिंचवड, एम आय डी सी चिखली, काळेवाडी, भोसरी एम आय डी सी,यशवंत नगर पिंपरी , त्रिवेणीनगर या परिसरातील शाळा या केवळ दुपारी १२.०० वाजेपर्यंतच सुरू ठेवून तदनंतर दुपारी १२ नंतर परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिनयम २००५ अंतर्गत शाळांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *