स्थलांतरित गरजू विद्यार्थ्यांसाठी फूड स्कॉलरशिप

Share this News

श्री सत्यसाई सेवा संघटना,पुणे व हेल्पिंग हँड संघटनेचे सेवाकार्य

पुणे दि.२२ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
     श्री सत्यसाई सेवा संघटना पुणे व हेल्पिंग हँड संघटनेच्या वतीने पुण्यात स्पर्धा परीक्षांचे तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकरिता दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून मोफत फूड स्कॉलरशिप उपक्रमाला सुरुवात होणार आहे.
    भगवान श्री सत्य साईबाबांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या माध्यमातून पुणे शहरात अनेक सेवा उपक्रम चालवले जातात ज्यात प्रामुख्याने शहरातील प्रमुख सरकारी रुग्णालयात मोफत नित्यभोजन सेवा, फिरते मोबाईल  रुग्णालय वाहन, मोफत डोळ्यांचे शस्त्रक्रिया या सारखे अनेक सेवा उपक्रम राबविले जातात. “सर्वां वर प्रेम करा,सर्वांची सेवा करा” या श्री सत्यसाई बाबांच्या संदेशा नुसार सत्यसाई सेवा संघटना समाजातील गरजू, दुर्लक्षित घटकांच्या सेवेकरीता कायम अग्रेसर असते.
    पुणे हे शहर विद्येचे माहेरघर मानले जाते,शहरात अनेक विद्यार्थी उच्चशिक्षणा करिता,स्पर्धा परीक्षांची तयारी करिता राहतात. हलाकी ची आर्थिक परिस्थिती यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पोटभर जेवण सुद्धा मिळत नाही. अशा  विद्यार्थ्यांकरता “फूड स्कॉलरशिप” हा उपक्रम येत्या २६जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहे.
    
फूड स्कॉलरशिप चा लाभ कोण व कसे घेऊ शकतात?
• अकरावी,बारावी किंवा पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी.
• स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेले विद्यार्थी मात्र ज्यांची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली असेल तेच विद्यार्थी.
• वरील पात्रता असलेले विद्यार्थी याकरता गुगल फॉर्म भरून अर्ज करू शकतात.
• अर्ज प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाईल व अंतिम निवड यादीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांना दिनांक २६जानेवारी पासून पुढील एका वर्षापर्यंत या उपक्रमाचा लाभ घेता येईल असे श्री सत्य साई सेवा संघटना व स्टूडेंट हेल्पिंग हँड संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *