पुणे मुंबई प्रवाशांना सुखद धक्का..

Share this News

– शिवाई बस सेवा सुरू

पुणे दि.२७ (सिटीनामा वृत्तसेवा)
पुणे – मुंबई प्रवास हा अनेकांसाठी परवलीचा शब्द आहे. नोकरी, व्यवसायानिमित्याने पुण्याहून अनेकजण मुंबई व परतीचा प्रवास करीत असतात या सर्व प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुखद धक्का दिला असून आरामदायी बस सेवा पुणे स्टेशन ते बोरीवली (सायन मार्गे) या मार्गावर ‘शिवाई’ ही अत्याधुनिक वातानुकूलित बस सेवा सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे.

परिवहन महामंडळाची ‘शिवाई’ बस सेवा ही सुरक्षितता, आराम आणि वेळेची अचूकता यासाठी ओळखली जाते. शिवाजीनगर आगारातून या बसचे संचलन व व्यवस्थापन केले जाणार असून, ही बस पूर्णपणे वातानुकूलित असल्याने उन्हाळ्याच्या झळा किंवा प्रदूषणाचा त्रास प्रवाशांना होणार नाही तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासात वेळेची बचत व्हावी, या हेतूने या बसच्या फेऱ्यांचे विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे.

बस फेऱ्या –
प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने सकाळी ६ वाजल्यापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या बसच्या एकूण ८ फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत:
सकाळच्या फेऱ्या पुढीलप्रमाणे ६:००, ७:००, ८:०० आणि ९:०० वाजता.
दुपारच्या फेऱ्या – १:००, २:००, ३:०० आणि सायंकाळी ४:०० वाजता.

कसा असेल मार्ग व तिकिट कसे बुक करावे ?
बस पुणे स्टेशन-चिंचवड-सायनमार्गे बोरीवली या मार्गावर धावणार आहे.
घरबसल्या करा तिकीट बुकिंग
प्रवाशांना आपला प्रवास आगाऊ निश्चित करता यावा, यासाठी महामंडळाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
१. बुकिंग करण्यासाठी पुणे स्टेशन बसस्थानक, वल्लभनगर, चिंचवड स्टेशन आणि निगडी बस स्थानकावर सेवा उपलब्ध
२. डिजिटल प्लॅटफॉर्म वरून एमसआरटीसीचे (MSRTC) मोबाईल ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट बुक करू शकतात.संकेतस्थळ खालीलप्रमाणे – https://npublic.msrtcors.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *