- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प
दिल्ली दि.३१ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या दि.१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता देशाच्या संसदेत २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
निर्मला सीतारामन यांचे अर्थमंत्री म्हणून सलग ९ वे अर्थसंकल्पीय भाषण असेल.
२०२६-२७ साठी यंदा आर्थिक विकासदर हा ६.७% ते ७.२% निश्चित करण्यात आला आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची प्रगती स्थिर राहणार आहे.भारत यंदा लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, निर्यात आणि निर्मिती क्षेत्र मजबूत करण्यावर भर देणार आहे. आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या महत्वपूर्ण धोरणांना चालना देण्यासाठी भारताने संरक्षण खर्चात वाढ केली आहे. त्यामुळे भारत जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याची शक्यता आहे. परदेशी गुंतवणूक व व्यापारात वाढ होण्याची शक्यता असल्याने जागतिक अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी फायदा होईल.भारत हरित, शाश्वत व सर्वसमावेशक विकासाला प्राध्यान्य देत असल्याने भारताचा आर्थिक आराखडा हा जागतिक स्तरावर महत्वपूर्ण ठरणार आहे.
व्यापार, गुंतवणूक व आर्थिक विकासावरही भारताचा व्यापक प्रभाव असल्याने अनेक देशांचे लक्ष भारतीय अर्थसंकल्पावर लागले आहे.
