शिवसृष्टीतील शैक्षणिक क्षेत्र भेट: विद्यार्थ्यांना प्रेरणादायी

Share this News

चिंचवड दि.१७ (सिटीनामा वृत्तसेवा)
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, चिंचवड संचलित क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर, चिंचवड या शाळेतील प्राथमिक विभागाची शैक्षणिक क्षेत्रभेट
नुकतीच कात्रज येथील शिवसृष्टी या ठिकाणी नुकतीच आयोजित करण्यात आली होती. आंबेगाव येथील भव्यदिव्य शिवसृष्टीत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या महनीय कार्याची अतिशय सुंदर अशी प्रात्यक्षिके आणि गड किल्ल्यांची माहिती मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तेथील शिवरायांची आरमार उभारणी हे अतिशय सुंदर प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थांच्या मनाला खूपच भावले. अतिशय उत्तम व दीर्घकाल स्मरणात राहील असा अनुभव त्यांना या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळाला; तसेच विद्यार्थ्यांना आपण एक वेगळा अनुभव देऊ शकलो याचे समाधान सर्व शिक्षकांना लाभले.                                  या शैक्षणिक क्षेत्रभेटीचा प्रारंभ कात्रज येथील स्वामीनारायण मंदिरातील स्वामींच्या दर्शनाने करण्यात आला. त्यानंतर कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेण्यात आले. तिथे असलेल्या विविध प्राणी व पक्षी यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. तेथील वैविध्यपूर्ण प्राणी व पक्षी पाहताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. संपूर्ण प्राणी संग्रहालयाचा विस्तीर्ण परिसर पायी हिंडताना विद्यार्थी आनंदित झाले होते. सदर शैक्षणिक सहलीचे नियोजन प्रशालेच्या प्र. मुख्याध्यापिका सरला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी शिक्षक यांनी केले होते. सदर शैक्षणिक सहलीच्या बस वाहतुकीचा संपूर्ण खर्च प्रशालेच्या प्र. मुख्याध्यापिका सरला पाटील यांनी स्वखर्चातून केला; तसेच प्रशालेतील उपशिक्षिका शामला वाघमारे आणि श्वेता उपाध्ये यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना अल्पोपहार व माध्यान्ह भोजन दिले. ही शैक्षणिक क्षेत्रभेट अतिशय आनंदात, उत्साहात व नियोजनबद्ध अन् उत्तमरीत्या पार पाडल्याने शाला समिती आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *