भारतीय संस्कृती ही वैश्विक आणि वैज्ञानिक – अविनाश धर्माधिकारी

Share this News

पिंपळे निलख दि.२ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)                      भारतीय संस्कृती वैश्विक आणि वैज्ञानिक असून विश्व कल्याणाची प्रार्थना करणारी आणि संपूर्ण विश्वाचे मंगल चिंतणारी संस्कृती केवळ भारतीय संस्कृती असल्याचे मत माजी सनदी अधिकारी, सुप्रसिद्ध व्याख्याते, चाणक्य मंडल परिवाराचे प्रा. अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले ते पिंपळे निलख भागातील पार्क स्ट्रीट संकुल व द वुड्स सोसायटी समिती आयोजित हिंदू एकता संमेलनात बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य, इस्कॉन चे उपाध्यक्ष व अन्नमृत फाऊंडेशनचे संचालक संजय विष्णुपंत भोसले, सामाजिक कार्यकर्ते डॉ.कल्याण गंगवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना धर्माधिकारी यांनी सनातन धर्म असलेल्या हिंदू धर्म, भारतीय संस्कृतीचे महत्व विशद करून संस्कृत ही जगातल्या भाषांची जननी असल्याचे सांगितले.सर्वांमध्ये एकच ईश्वरी चैतन्य भरलं आहे हाच हिंदू सनातन धर्म असून आपण एकाच ईश्वराचे अंश आहे ते ओळखून तशी सद्सदबुधी विवेक जागृत ठेवून आचरण करणे हा हिंदू धर्म असल्याचे सांगितले. भाषा भेद हा एकतेवर घाव असून कधीही भाषा, प्रांत भेद न करता एकत्वाने हिंदू हितासाठी एक येणे काळाची गरज असल्याचेही अधोरेखित केले. संजय भोसले यांनी रामायणाचे महत्व सांगताना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या भाषेत रामायण लिहिले गेले असल्याचे सांगून आत्तापर्यंत सर्वात जास्त साहित्य प्रभू श्रीरामावर लिहिल्याचे सांगितले. सध्याची परिस्थिती ओळखून आपण धर्म रक्षणार्थ उभे राहण्याचे आवाहन केले. प्रत्येक हिंदू कडे खाजगी मोबाईल प्रमाणे वयक्तिक गीता असावी आपल्या मुलांना आपण गीता, भागवत, रामायण शिकवण्याची गरज असल्याचे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायणावरून राजगड च्या संजीवनी आणि सुवेळा माचीचे नाव ठेवल्याचे अधोरेखित केले.इस्कॉन धर्म प्रचाराचे काम सर्व स्तरात करत असून सकल हिंदू समाजाने जागृत होऊन उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे.डॉ.कल्याण गंगवाल यांनी अशी संमेलने आवश्यक असून यामुळे हिंदू जागृत होत असल्याचे मत व्यक्त केले.


संमेलनाला नगरसेवक संदीपकस्पटे, आरती चोंधे, स्नेहाकलाटे आणि विनायक गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.ओम हॉस्पिटल चे डॉ.अशोक अग्रवाल, नरेश वासवानी, कुलदीप सरना,अरुण देशमुख, धनंजय खोंड मनिष बन्सल,रतन मुंधडा,राजकोळेकर,भास्कर,ब्रिजेश झा, पराग भोळे,अमोल कोकाटे, प्रा.डॉ. दीपक येवले या समाजकार्यात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.विराट संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पार्क स्ट्रीट आणि वूडस् संकुलातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.या भव्य आयोजनासाठी संयोजक मनिष बन्सल,अरूण देशमुख, धनंजय खोंड, साईप्रसाद जोशी, कोषाध्यक्ष दीपक येवले, गोरक्ष गायकवाड, वसंत महाजन, विठ्ठल मच्चा, नरेंद्र शर्मा, संतोष वाघ, मनोज कोतकर, शंकर उपाध्याय, जगदीश व्यवहारे, अनुराग जैन, विशाल जैन, मोहन पत्की, गजानन मोरे, महेश धमेचा, स्मिता कोतकर, मेघा विजयवर्गीय, रजनीश श्रीमाळी, महेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.
शीतल म्हसतकर यांच्या बहारदार गायनाने उपस्थितींची मने जिंकली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक येवले आणि सौ. कविता त्यागी यांनी तर आभार अरुण देशमुख यांनी मानले.

दिमाखदार शोभायात्रा
कार्यक्रमाचा शुभारंभ सायंकाळी ५.३० वाजता एका भव्य शोभायात्रेने झाला. टायटॅनियम सोसायटी ते फाउंटन मार्गे पुन्हा टायटॅनियम अशी ही यात्रा काढण्यात आली. राजकमल बँडच्या देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी, सनई-चौघडा आणि तुतारीच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिलांच्या भजनी पथकाचा सहभाग आणि प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या जयघोषाने वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. यानंतर शीतल म्हसतकर यांनी सुश्राव्य गणेशवंदना सादर केली व स्मिता पाटील, अपर्णा मुळे, प्रसाद भावसार आणि विशाल जैन यांनी श्रीराम स्तुती गायली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *