पुणे दि.९ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
भारतीय ज्ञान परंपरा सर्वांपर्यंत पोहचावी या संकल्पनेतून दहा वर्षांपासून सुरू असलेल्या श्री समर्थ वेद वर्गाच्या वतीने अक्षरब्रह्म ही स्मरणिका तयार करण्यात आली आहे. तिचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व अखिल भारतीय कुटुंब प्रबोधन संयोजक डॉ. रवी जोशी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. सेवानिवृत्त प्राध्यापिका कल्पना क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून हा निशुल्क वर्ग सुरू झाला असून त्या नियमितरित्या भारतीय ज्ञान परंपरेचे भांडार अत्यंत ओघवत्या भाषेत मांडत असतात. त्यातून समर्थ वेद वर्गाच्या दशकपूर्ती निमित्ताने स्मरणिकेची संकल्पना पुढे आली. या स्मरणिकेच्या संपादकासह छपाई, मुखपृष्ठ हे त्यांच्या नातवंडांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले. सहभागी साधकांना एक एक विषय देऊन, त्यातून स्मरणिकेतील लेखांची रचना केली आहे. प्रकाशन समारंभ अतिशय साध्या पद्धतीने उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला संस्कारक्षम, रचनात्मक व तितकीच भावनात्मक किनार होती.

या विशेष कार्यक्रमाला संजय कुलकर्णी सहप्रांत संयोजक कुटुंब प्रबोधन, विभाग कुटुंब प्रबोधन संयोजक श्रीराम कुलकर्णी, जिल्हा कुटुंब प्रबोधन संयोजक प्रदिप बेलुरकर,अभिमन्यु मुळे ,ऐनापुरे, अक्षर जुळणी करणारे, विजयाताई वेल्हाणकर,सौ.संध्याताई कुलकर्णी सह मातृशक्ती आयाम प्रमुख,सौ.स्वाती, प्रसाद क्षीरसागर, पार्थ क्षीरसागर, अजिंक्य ढोले, सोहम कुलकर्णी, आणि प्रकाश क्षीरसागर,सौ.कल्पना क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.


