पुणे दि.२४ (सिटीनामा वृत्तसेवा) सेवाकार्यातील अग्रेसर संस्था असलेल्या स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी स्वातंत्रवीर सावरकर स्मृती व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात येत असते यावर्षी येत्या गुरुवार दि.२९ जानेवारी ते रविवार दि.१ फेब्रुवारी पर्यंत पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील आनंदक्षण मैदान, सिंहगड रस्ता पोलिस चौकीजवळ, सन सिटी रस्ता येथे दररोज सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यामालेचे उद्घाटन उदय तथा तात्या जोगळेकर, जेष्ठ प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे हस्ते होणार असून गुरुवार दि.२९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता राम कृष्णाच्या पाऊलखुणा या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते निलेश ओक पहिले पुष्प गुंफणार आहेत, दि.३० जानेवारी रोजी संघशक्तीचा शतकोत्तर प्रवास या विषयावर लेखिका डॉ.विनिता तेलंग बोलणार आहेत. दि.३१ जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर: सात शतकांचे विद्यापीठ या विषयावर निरुपणकार डॉ. भावार्थ देखणे निरुपण करणार असून, दि.०१ फेब्रुवारी रोजी भारत आर्थिक महासत्ता – काल, आज आणि उद्या या महत्वपूर्ण विषयावर पद्मश्री मिलिंद कांबळे व्याख्यान देणार आहेत.
ही सर्व व्याख्याने अतिशय श्रवणीय होणार आहेत. महत्वपूर्ण विषय आणि उत्कृष्ट वक्ते हे या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य असून या भव्य आयोजनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी, युवकांनी, महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर काळकर, सचिव रविंद्र शिंगणापूरकर, व्याख्यानमाला प्रमुख राघवेंद्र देशपांडे यांनी केले आहे.
