लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत? काही चूक झाली? ३१ मार्च पर्यंत दुरुस्तीची संधी!

Share this News

मुंबई दि.६ (सिटीनामा वृत्तसेवा)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत इ- केवायसी प्रक्रियेत ज्यांच्याकडून काही चूक झाली आहे,
त्यांच्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ३१ मार्च २०२६ पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्या लाडक्या बहिणींनी ऑनलाईन इ- केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आला त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने त्यांना ती चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *