एस.टी.बसमध्ये सवलत प्रवास करायचाय..मग घ्यावे लागणार हे ‘कार्ड ‘

Share this News

मुंबई दि.१२ (सिटीनामा वृत्तसेवा)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) म्हणजेच लालपरी बसमध्ये विविध योजनांतील सवलतधारक किंवा सवलतीच्या योजनेअंतर्गत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ म्हणजेच नॅशनल कॉमन मोबालीटी कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस.टी. बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग,जेष्ठ नागरिक,महिला, पुरस्कारार्थी, अधिस्वीकृती धारक पत्रकार यांच्यासाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत या सवलतीचा लाभ घेण्यासाठी बऱ्याचदा खोटे ओळखपत्र,कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आल्याने या सवलतीमध्ये पारदर्शकता येण्याच्या हेतूने व योग्य प्रवाशांना सवलत मिळण्यासाठी महामंडळाने एन सी एम सी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेमुळे सवलतींची योग्य नोंद, तिकीट, सुट्या पैशांची कटकट संपणार आहे.

बसस्थानकांवरच सदर कार्ड मिळणार आहे.नवीन कार्ड घेण्यासाठी १९९ रुपये मोजावे लागणार आहे तर कार्ड जुने झाल्यास १४९ रुपयात नवीन कार्ड मिळेल यामध्ये किमान १०० रुपये असणे आवश्यक आहे. कार्डचा रिचार्ज ५० रुपयाच्या पटीत करावा लागणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तीन हजार महिला, जेष्ठ नागरिक, महिला एजंट नियुक्त करण्यात आल्याची माहिती आहे.

कोणाकोणाला मिळणार स्मार्ट कार्ड?

-विद्यार्थी – शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड मिळणार.
-ज्येष्ठ नागरिक व महिला – अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळणार

-अपंग प्रवासी – अपंग प्रमाणपत्र क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड मिळणार

पुरस्कारार्थी व पत्रकार – स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय किंवा मुख्यालय आगारा मार्फत वितरण करणार असल्याचे महामंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

एसटीचा हा निर्णय परंपरागत व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा असून सुट्या पैशांची चिंता संपून प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित होणार असल्याचे परिवहनमंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *