शिवजयंती: शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला इंद्रापार्कचा परिसर..

Share this News

रावेत दि.१९ (सिटीनामा वृत्तसेवा)
डौलात फडकणारे भगवे ध्वज,  पताका, रांगोळ्यांनी सजलेला इंद्रा पार्क सोसायटीचा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता निमित्य होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचे..!!

पिंपरी चिंचवड शहरातील किवळे भागातील इंद्रा पार्क सोसायटीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण सोसायटी परिसर स्वच्छ करून पताका लावून, रांगोळी काढून सजविण्यात आला होता. सोसायटी गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या देखण्या व्यासपीठावर सकाळी ११.३०  दरम्यान सोसायटी कमिटी व सभासद मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. सायंकाळी ६ ते ९ दरम्यान भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये
सोसायटीमधील चिमुकल्यांनी आपल्या सुंदर सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सोसायटीमधील महिलांच्या नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमात लहानग्यांनी शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावर भाषणे, गीते, नृत्यकला सादर केली.
त्यानंतर शिवरायांची सामूहिक महाआरती करण्यात आली. शेवटी शिवछत्रपतींचा जयघोष करण्यात येऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीमधील मुलामुलांनीच केले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून कार्यक्रम संचालनाचा अनुभव घेता आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी अध्यक्ष, कमिटी सर्व सभासद, सांस्कृतिक समिती, इंद्रा पार्क यांनी संयोजनात सहकार्य केले.
इंद्रा पार्कमध्ये दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात त्यामध्ये सोसायटी सभासद सहकुटुंब सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घेतात यामुळे एकोप्याचे भावना अधिक दृढ होते असे सभासदांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *