गणपती बाप्पा मोरया ! महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल…

Share this News

दिल्ली दि.२९ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
नुकतेच दिल्लीत देशाच्या ७७  व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य सोहळ्यात विविध राज्यांच्या चित्ररथाचे प्रदर्शन झाले त्यात महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. महाराष्ट्राच्या या चित्ररथाने  देशांत प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून  या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ यावर आधारित चित्ररथ सादर केला होता. या  माध्यमातून महाराष्ट्राचा गणेशोत्सव आणि त्यातून मिळणारा आत्मनिर्भरतेचा संदेश हा विशेष ठरला. चित्ररथावरील भव्य गणेशाची मूर्ती, पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांच्या उत्साहाने कर्तव्यपथ दुमदुमून गेला होता. प्रभावी सादरीकरणामुळे या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे यामुळे महाराष्ट्रातील कलाकारांना विशेष प्रोत्साहन मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *