पिंपरी दि.२५ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून समर्थ भारत सक्षम भारत अभियानांतर्गत जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नवमहाराष्ट्र शाळेच्या मैदानाजवळ पिंपरी (पिंपरी चिंचवड , पुणे)येथे दि.२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या सामाजिक उपक्रमात युवकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन समर्थ भारत सक्षम भारत अभियान वैद्यकीय प्रमुख डॉ.योगेश पिंगळे, समर्थ चॅरिटेबल फाउंडेशन चे डॉ.प्रथमेश फुलसुंदर, महा ब्लड सेंटर पुणे तसेच स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वाळुंजकर स्पर्धा प्रतिष्ठान पिंपरी गौरव वाळुंजकर, शिवछत्रपती मित्र मंडळाचे पैलवान रुद्र वाळुंजकर यांनी केले आहे.
