-मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर येथे महिलाराज
पिंपरी-चिंचवड दि.२२ (सिटीनामा वृत्तसेवा) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज, दि.२२ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील मंत्रालयात पार पडली असून या सोडतीमध्ये पिंपरी-चिंचवडसाठी खालीलप्रमाणे आरक्षण निघाले आहे:
पिंपरी-चिंचवड महापौरपद आरक्षण (२०२६-२०२८)
आरक्षित प्रवर्ग: पिंपरी-चिंचवडचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला/पुरुष ‘या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे तर मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर मध्ये महिला राखीव आरक्षण निघाल्याने या महानगरपालिकेत महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे आरक्षण पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल.
पिंपरी चिंचवड शहरातील पक्षीय बलाबल कसे आहे ते जाणून घेऊ.. (एकूण १२८ नगरसेवक):
भारतीय जनता पार्टी ८४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३७
शिवसेना (शिंदे गट) ०६
अपक्ष ०१
पुढील प्रक्रिया जाणून घेऊ…
- निवडींचा कार्यक्रम जाहीर करणे : आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता विभागीय आयुक्तांमार्फत महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
- अर्ज दाखल करणे: इच्छुक उमेदवारांना महापौरपदासाठी अर्ज दाखल करावे लागतील.
- निवडणूक: साधारणपणे पुढील १५ दिवसांच्या आत विशेष सभा बोलावून नवीन महापौरांची अधिकृत निवड केली जाईल.
- महापौरपद सर्वसाधारण महिला/ पुरुष साठी राखीव झाल्यामुळे आता सत्ताधारी भाजपमध्ये अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले असल्याने आता भाजपमधील पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातील महापौर होणार, याकडे राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
(बातमीतील छायाचित्र हे संग्रहित डिझाइन छायाचित्र आहे)
