पुणे दि.२६ (सिटीनामा वृत्तसेवा)
२६जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त किल्ले विसापूर वर ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ दळवी, सहायक अधिकारी पांडुरंग वावळे,अनिकेत आंबेकर,सचिन निंबाळकर,चेतन जोशी, रोहित नगिणे हे उपस्थित होते. या ध्वजारोहणाच्या निमित्ताने उपस्थित कार्यकर्त्यांसमोर सचिन टेकवडे यांनी मनोगत व्यक्त केले हे गडकोट टिकले तर आपली संस्कृती टिकेल. छत्रपती शिवरायांनी आणि मावळ्यांनी केलेला पराक्रम याची साक्षीदार असलेली ही भूमी आहे. ही आपली पावन भूमी आहे. त्याचबरोबर या किल्ल्याच्या परिसरात असलेल्या जंगली संपत्ती ही टिकली पाहिजे. आपले जंगल आपण जपले पाहिजे . सध्या मोठ्या प्रमाणावर या परिसरात वृक्षतोड होत आहे याची आपण काळजी घेतली पाहिजे. ध्वजारोहण झाल्यानंतर शिव मंदिरात अभिषेक करण्यात आला .यावेळी किल्ल्यावरती पुरातत्व विभागाचे मच्छिंद्र वाघमारे,सुभाष दिहीभाते, देविदास ढगे, रोहित नगिणे हे उपस्थित होते.
