प्रजासत्ताक दिनी ई-वेस्ट संकलन मोहीम

Share this News
  • पर्यावरण संरक्षण गतिविधी, पूर्णम इकोविजन, आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

चिंचवड दि.२५ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)

आपल्या घरी इ कचरा (वेस्ट) म्हणजेच खराब झालेल्या, वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील (फक्त ट्यूब व बल्ब सोडून)त्यामुळे अडगळ तर होतेच त्यामुळे आपण त्या सरसकट कचऱ्यात टाकतो त्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होते त्यामुळे त्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे – ई कचरा संकलन मोहीम..!!

आज दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ८ पासून खालील स्कॅनर वर स्कॅन करून पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील आपल्या घराजवळील केंद्र बघून तिथे संपर्क करून आपल्या घरातील खराब झालेल्या, अडगळीतील इ कचरा देऊन पर्यावरणास हातभार लावण्याची सुवर्णसंधी आहे.

पर्यावरण संरक्षण गतिविधी, पूर्णम इकोविजन, आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने ई-वेस्ट संकलन मोहीमेचे पाचवे वर्ष सुरू होत आहे. ही मोहीम २६ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रातील १६० हून अधिक केंद्रांवर राबवली जाईल. सोसायटी, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ही मोहीम विशेषतः आयोजित केली आहे.

ई-वेस्टमधील धोकादायक रसायने पृथ्वीला प्रदूषित करतात, ज्यामुळे माती, पाणी आणि हवा यांचे नुकसान होते. या मोहिमेद्वारे ई-वेस्ट योग्य पद्धतीने संकलित करून शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल. ई-यंत्रण मोहिमेतून संकलित ई-वेस्टमधून दुरुस्त केलेले संगणक आणि लॅपटॉप गरजू स्वयंसेवी संस्था दान केले जातात. गेल्यावर्षी दहा संस्थाना डेस्कटॉप देण्यात आले.

ई-वेस्ट संकलन हे पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कल्याणाचे दुहेरी उद्दिष्ट साध्य करते. नागरिकांनी सक्रिय सहभागी होऊन पृथ्वीला विषारी पदार्थांपासून वाचवावी, असे पर्यावरण संरक्षण गतिविधीचे संयोजक सुधीर मारुलकर म्हणाले. पिंपरी चिंचवड क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी आणि संस्थांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *