पुणे दि.७ (सिटीनामा वृत्तसेवा)
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स २०२५’ च्या
आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ नुसार, पुणे शहर हे राहण्यासाठी सर्वोत्तम शहर ठरले आहे. राहण्यासाठी चांगले शहर म्हणून ‘पुण्यनगरी’ पुण्याने हा बहुमान प्राप्त केला असल्याची माहिती आहे. उत्तम पायाभूत सुविधा, शिक्षण, कचरा व्यवस्थापन आणि हवामान आदी बाबींचा यासाठी विचार करण्यात आला होता. बंगळुरू ला मागे टाकत पुण्याने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. सांस्कृतिक पंढरी व शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला आता अजून एक महत्वपूर्ण सन्मान मिळाला आहे.
राहण्यासाठी उत्तम या रँकिंग मधील देशातील पहिली १० शहरे खालीलप्रमाणे –
१.पुणे
२.नवी मुंबई
३.मुंबई
४.तिरुपती
५.चंदिगड
६.ठाणे
७.रायपूर
८.इंदूर
९.विजयवाडा
१०. भोपाळ
राहण्यासाठी उत्तम असले तरीही टोमटॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२५ नुसार मात्र पुणे शहर ट्रॅफिक कोंडीत जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर असल्याचीही माहिती आहे.
