जगज्जेता भारत: विजयी विश्व तिरंगा प्यारा..!!

Share this News

अहमदाबाद दि.८ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
आज रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी भारतातील अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या आय सी सी मेन्स टी ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्या संघाने न्यूझीलंड संघाला तब्बल ९६ धावांनी धूळ चारत टी ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्ड कप वर भारताचे नाव कोरले.

सामन्यात भारताच्या सॅमसन ने ४६ चेंडूत तब्बल ८९ धावा काढल्या तर जसप्रीत बुमराहने ४ फलंदाजांच्या विकेट घेतल्या हे विशेष.

नरेंद्र मोदी स्टेडियम प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. स्टेडियम भारताच्या चाहत्यांनी खचाखच भरले होते. अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते देखील देखील बघायला मिळाले.

सुरुवातीपासूनच भारताने सामन्यावर आली पकड मजबूत केल्याने विजय निश्चित मानला जात होता. विजयानंतर भारतभरात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण फुलून गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *