चिंचवड दि.२२ (सिटीनामा वृत्तसेवा)
AI समिटमध्ये गोंधळ “भारताचा अपमान करणाऱ्यांना माफी मागावीच लागेल” ही भूमिका पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेनेने घेऊन काँग्रेसने समिटमध्ये घातलेल्या गोंधळाचा जाहीर निषेध केला.
भारत आज जागतिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण करत आहे. ‘जागतिक AI समिट’सारख्या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे नेतृत्व अधोरेखित होत असताना, काँग्रेस पक्षाने निर्माण केलेला गोंधळ हा अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय प्रकार आहे.जग भारताकडे तंत्रज्ञानाच्या महासत्ता म्हणून पाहत असताना, अशा प्रतिष्ठेच्या मंचावर अनावश्यक राजकीय मुद्दे उपस्थित करून देशाच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार केवळ राजकीय विरोध नसून, देशाच्या सन्मानावरच घाला घालणारा आहे.या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध करण्यासाठी शिवसेना पिंपरी चिंचवड शहरतर्फे पिंपरी चिंचवड शहरातील मध्यवर्ती भाग चापेकर चौकात जाहीर आंदोलन करण्यात आले. यावेळी “देशाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही” या ठाम भूमिकेसह घोषणाबाजी करण्यात आली. “युवा काँग्रेसचे नेते रागा, देशवासीयांची माफी मागा” असे फलक दर्शवत काँग्रेसकडून सार्वजनिक माफीची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेना गटनेते नगरसेवक विश्वजीत बारणे, शिवसेना उपनेत्या स्थायी समिती सदस्या सौ.सुलभाताई उबाळे, शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक निलेश तरस, शिवसेना जिल्हा संघटिका शीलाताई भोंडवे, युवती सेना जिल्हा संघटिका सायली ताई साळवी युवती सेना शहर प्रमुख रितू ताई कांबळे, सोशल मीडिया चिंचवड विधानसभा संघटिका श्वेता ताई कापसे, सोशल मीडिया चिंचवड विधानसभा सहप्रमुख, तेजश्री ढोरे, सोशल मीडिया चिंचवड विधानसभा समन्वयक एडवोकेट प्रीती दराडे, शिवसेना उपशहर प्रमुख दिलीप कुसाळकर, शिवसेना सोशल मीडिया टीम पिंपरी विधानसभा अध्यक्ष राजीव मेनन, केदार चासकर, नारायण लांडगे, वाल्हेकर दीपक,राजीव रहाटे, सुजित कांबळे, अनिकेत चौधरी, प्रशांत करडे , शुभम खानविलकर , विक्रम झेंडे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देशहिताची ठाम भूमिका मांडत काँग्रेसच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला.
