दिल्ली दि. 11फेब्रुवारी ( सिटीनामा वृत्तसेवा)
केंद्र सरकार ने आदेश काढून तीन मिनिटे दहा सेकंदांच्या सहा कडव्यांच्या वंदे मातरम चे वादन किंवा गायन अनिवार्य केले आहे. ‘राष्ट्रगान जनगणमन’ चे आधी वंदे मातरम् गायन किंवा वादन केले जाईल.या सरकारी आदेशानुसार वंदे मातरम सुरु असताना उभे राहणे आवश्यक आहे. या पुढे सर्व सरकारी कार्यक्रमामध्ये वंदे मातरम हे गीत विहित वेळेत मर्यादेत गायले किंवा वाजवले जाणार आहे.
हा नियम राष्ट्रध्वज फडकावण्याच्या वेळी,कार्यक्रमामध्ये राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्या आगमन प्रसंगी तसेच राष्ट्रपतींच्या राष्ट्राला उद्देशून दिल्या जाणाऱ्या तसेच राष्ट्रपतींच्या व राज्यपालांच्या भाषणापूर्वी आणि नंतर वंदे मातरम निर्धारित कालावधी व कडवी अनिवार्य करण्यात आली आहे.
पद्म पुरस्कारा सारख्या नागरी पुरस्कार समारंभात वंदे मातरम वाजवले जाईल. सध्या सिनेमा हॉलला या नियमातून वगळण्यात आले आहे. वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाले आहे या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
