स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या नामांतराची मागणी

Share this News

पुणे दि.२३ (सिटीनामा वृत्तसेवा)
शनिवारवाड्याच्या २९४ व्या वर्धापनदिनानिमित्य पुण्यातील शनिवारवाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वारगेट मेट्रो स्टेशनला “श्री नानासाहेब पेशवा” नाव देण्याची मागणी थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान व समस्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली.
मेट्रोच्या बांधकामाच्या वेळी स्वारगेट मेट्रो स्टेशनला नानासाहेब पेशवा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मेट्रो प्रशासनाच्या प्रतिनिधींना देण्यात आला होता. मात्र त्यावेळी मेट्रो स्थानकांना त्या परिसराच्या नावावरच नामकरण करण्यात येईल, वेगळे ऐतिहासिक नाव दिले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र अलीकडे काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर स्वारगेट स्टेशनचे नाव बदलून “श्री नानासाहेब पेशवा मेट्रो स्टेशन” असे नामकरण करावे, अशी मागणी थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान यांच्या वतीने कुंदनकुमार साठे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
आजच्या या पवित्र दिवशी ही मागणी गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत उपस्थित नागरिकांनी एकमुखाने पाठिंबा दिला. हा विषय आमदार हेमंत रासने, नवनिर्वाचित नगरसेवक कुणाल शैलेश टिळक,भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी पांडे,थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर चीफ मार्शल भूषणजी गोखले
यांच्या प्रमुख उपस्थितीत मांडण्यात आला.याप्रसंगी समस्त ब्राह्मण संघाच्या वतीने सचिन टापरे, डॉ. सचिन बोधनी व श्रीराम जोशी यांनी या मागणीला ठामपणे उचलून धरले. ही मागणी केवळ निवेदनापुरती न राहता ती प्रत्यक्षात उतरली पाहिजे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.इतिहासात अतुलनीय योगदान देणाऱ्या पेशवाई परंपरेचा सन्मान म्हणून स्वारगेट मेट्रो स्टेशनला श्री नानासाहेब पेशवा यांचे नाव देण्यात यावे, अशी सर्व उपस्थितांनी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *