काळेवाडी / पिंपरी चिंचवड दि.१३ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)
श्रावण मासानिमित्त नाथपंथी समाज पिंपरी चिंचवड (मर्यादित), नाथपंथी डवरी सामाजिक संस्था व विठ्ठल रुक्मिणी सेवा ट्रस्ट, काळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने भाविकांच्या उस्फूर्त प्रतिसादात उत्साहात संपन्न झाले.
श्री श्री गुरु गोरक्षनाथ मंदिर, न्यू इंडियन कॉलनी, नढे नगर, काळेवाडी येथे श्री श्री नवनाथ पारायण महोत्सव दि. ०१ सप्टेंबर ते ०९ सप्टेंबर या ९ दिवसीय महोत्सवात व्यासपीठ व अनुष्ठान सेवा नवनाथ पारायण व्यासपीठ प्रवर्तक नाथभक्त अशोकजी ठोसर व त्यांचे शिष्यगण – घनश्याम वखारे, श्रेयश गार्डी, सौ. पौर्णिमा ताई बर्गे, सौ. पल्लवी पाटील, वेदांत बारणे, चैतन्य कुलकर्णी यांनी अखंड अनुष्ठान सेवा बजावली.

नवव्या समारोपीय दिवशी समारोप प्रसंगी ह.भ.प. ऋषिकेश महाराज चोरघे (कोथरूड) यांचे श्री गुरु गोरक्षनाथ महाराज चरित्रावर सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर विधी हवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास सामाजिक समरसता गतीविधी प्रदेश कार्यकारी मंडळ सदस्य ऍड. मुकुंद यदमल, नाथपंथी डवरी सामाजिक संस्था व भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष व संयोजक ललित कासार, संपर्क प्रमुख व कार्याध्यक्ष राजाभाऊ निकम, खजिनदार अरुण कोष्टी, हितरक्षक रोहित राजपूत, उपाध्यक्ष संजय कदम, सचिव भैरवनाथ नार्वे, प्रसिद्धी प्रमुख किरण जाधव, कार्यकारणी सदस्य गोरख कदम, प्रशांत डवरी, संतोष डवरी, सोमनाथ निकम, अशोक पवार, जैस्वाल महाराज, धर्मा जाधव, प्रकाश बामणे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे पदाधिकारी, महिला मंडळ, टाळकरी, विणावादक, वारकरी परिवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, तसेच सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक, व्यावसायिक वर्गणीदार, महिला मंडळ व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी गायक-वादक, मंडप, आचारी, वाढपी, सर्व सेवेकरी व समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ग-प्रभाग क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप साहेब, आरोग्य अधिकारी सोनवणे साहेब, स्वप्नील गायकवाड साहेब, सुरज कुंभार साहेब व सर्व महापालिका कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ललित कासार यांनी सर्वांचे आभार मानले.
