मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत विशेष हेल्पलाईन सुरू…

Share this News

मुंबई दि.२३ (सिटीनामा वृत्तसेवा)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत अनेक लाभार्थी महिलांना हफ्ते जमा न होणे, के वाय सी या संदर्भात अडचणी येत होत्या त्या सर्व अडचणी निवारण्यासाठी आता शासकीय कार्यालयात चकरा मारण्याची गरज नसून यासाठी राज्य सरकारने लाभार्थी महिलांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन सुरू केली असून यामध्ये 181 या क्रमांकावर कॉल केल्यास योजनेशी संबंधित सर्व शंकांचे तक्रारीचे निवारण एक कॉल वर होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
या कॉल सेंटर वर या योजनेसंबंधी तक्रार निवारण होणार असून संबंधित कॉल सेंटर ऑपरेटर यांना योग्य ते प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा लाभ डिसेंबरच्या अखेरीस तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. डिसेंबर महिन्याचा लाभ १४ जानेवारीच्या सुमारास महिलांच्या बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आला असल्याची माहिती आहे. लाभार्थी महिलांनी योजने संदर्भात अडचणी आल्यास १८१ वर कॉल करून समस्या मांडावी असे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *