पिंपरी दि.१७ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच उत्सवाचा राजा. या उत्सवाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात मोठा उत्साह असून ठिकठिकाणी सुंदर देखावे सादर करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या जयहिंद मित्र मंडळाच्या माध्यमातून यावर्षी अहिरावणाचा वध हा हलता देखावा सादर करण्यात आला आहे तसेच हरित सेतू प्रकल्प विरोधात जनजागृती केली आहे.
गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून सामाजिक प्रबोधन, जनजागृती आणि समाजहिताचा संदेश देण्याचे प्रभावी माध्यम आहे, हीच भूमिका जपत यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे जयहिंद मित्र मंडळ – ट्रस्ट, सेक्टर २८ जयहिंद चौक, प्राधिकरण यांनी सिटीनामा न्यूज सोबत बोलतांना सांगितले.
जयहिंद मित्र मंडळ दरवर्षी समाज प्रबोधनपर विविध विषयांवर जागृती करीत असते व त्याला नागरिकांचा देखील उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत असून नागरिक देखील गर्दी करीत आहे.
