घोरावडेश्वर जेष्ठ नागरिक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर!

Share this News

रावेत दि.१ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
तरुण या शब्दाची व्याख्या केवळ वयानुसार केली जात नसून मनाने सदैव तरुण असल्याचे घोरावडेश्वर जेष्ठ नागरिक संघ, युवा व महिला मंच परिवार यांनी आपल्या कार्याने दाखवून देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत भागातील घोरावडेश्वर जेष्ठ नागरिक संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच एका विशेष सभेत जाहीर करण्यात आली. जेष्ठ नागरिक संघाची विशेष सभा वंदनीय स्व.बाजीराव बाबुराव भोंडवे पाटील विरंगुळा केंद्र या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने सभेमध्ये जेष्ठ नागरिक संघाचे आधारस्तंभ संस्थापक सुरेशशेठ बाजीराव भोंडवे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अपेक्षित सर्व इच्छुक संचालकांनी हजेरी लावली होती. या कार्यान्वित संचालकांच्या प्रदीर्घ चर्चेअंती जेष्ठ नागरिक संघाच्या २०२६ ते २०२८ या वार्षिक कालावधीसाठी खालील संचालक कार्यकारिणी मंडळ सर्व सहमतीने स्थापन करण्यात आले आल्याची माहिती घोरावडेश्वर जेष्ठ नागरिक संघातर्फे देण्यात आली आहे.

  • कार्याध्यक्ष: जयंत धोंडीबा कुंटे
  • अध्यक्ष: बाळू एकनाथ शेंडे
  • उपाध्यक्ष: संपत वसंतराव माळी
  • सचिव: खंडू हरिभाऊ पवार
  • सहसचिव: पंढरीनाथ राजाराम सानप
  • खजिनदार: जयवंत सखाराम काटकर
  • सहखजिनदार: प्रदीप शंकर साळुंखे

संचालक:

  • वसंत बळवंत काळभोर
  • नानासो. रंगराव शिंदे
  • सूर्यकांत कोंडीबा झरेकर
  • समाधान पांडुरंग चौगुले
  • बाबु माणिक सुरवसे
  • प्रभाकर गणपत वाघोले
  • मोहन बाजीराव शेळके
  • महिलांसाठी राखीव
  • महिलांसाठी राखीव

कायदे सल्लागार:

  • जनार्दन रमेश दहातोंडे

सल्लागार:

  • शाहूराज श्रीपतराव कदेरे
  • प्रकाश जगन्नाथ पवार
  • वसंत रामचंद्र येवले
  • संजय आनंदराव राऊत

नियुक्त कार्यकारी मंडळास मंडळाचे आधारस्तंभ संस्थापक सुरेशशेठ बाजीराव भोंडवे पाटील यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी व कार्यकारिणीचे कार्य सुरळीत चालविण्यासाठी सर्व संचालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. वरील कार्यकारिणी मंडळ रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ पासून कार्य सुरू करतील.

सर्व सभासदांकडून संघाच्या कार्यास आज पर्यंत चांगले सहकार्य मिळाले असून पुढेही जेष्ठ नागरिक संघ उत्कृष्ट पद्धतीने कार्य करेल हा विश्वास सचिव खंडू पवार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *