चिंचवड दि.२४ (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड जिल्हा बालगोकुलम तर्फे रथसप्तमीनिमित्त सामूहिक सूर्यनमस्कार फ्लॅशमॉब या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दि.२५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता चिंचवड येथील एल्प्रो मॉल मध्ये करण्यात आले आहे.
परिसरातील लहान मुलांना संस्कारक्षम करण्याकरिता बालगोकुलम संस्थेतर्फे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात निःशुल्क संस्कारवर्ग चालविले जातात. बालगोकुलमतर्फे मुलांसाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून संस्कार, सेवा या मूल्यांसह मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली जाते. या उपक्रमात शहरातील पालकांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन बालगोकुलम तर्फे करण्यात आले आहे.
