पुणे दि.१७ (सिटीनामा वृत्तसेवा)
महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशाचे शिल्पकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहरात कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे विधानसभा आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, विधानपरिषेचे आमदार उमाताई खापरे, आमदार अमितजी गोरखे यांचे अभिनंदन करून कौतुक केले.मुख्यमंत्री कायम भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल शाबासकी देऊन उंचावत असतात. पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून आमदारांसह भाजपा कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी, “तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे अत्यंत चांगले यश संपादन केले आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास आपल्या कार्यातून सार्थ ठरवा.” तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
“जोमाने कामाला लागा, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करा,” असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारही आमदारांना दिला. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास आमदारांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री कायम भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल शाबासकी देऊन उंचावत असतात. पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून आमदारांसह भाजपा कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी, “तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे अत्यंत चांगले यश संपादन केले आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास आपल्या कार्यातून सार्थ ठरवा.” तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास आमदारांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

