गुरुवारी होणार राज्यातील २९ महापौरपदाची आरक्षण सोडत

Share this News

मुंबई दि.१९ (सिटीनामा वृत्तसेवा)
राज्यातील २९ महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत मा.नगर विकास राज्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि.२२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती नगर विकास विभागाकडून अधिकृत पत्रक जारी करून देण्यात आली आहे.
नुकत्याच राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आता महापौर कोण होणार ? याची चर्चा असल्याने गुरुवारी होत असलेल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *