आकुर्डी दि.१३ (सिटीनामा वृत्तसेवा) :
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आकुर्डी नगर आणि डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालय यांच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अथर्व भादेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे प्रगल्भ विचार, त्यांचे ओजस्वी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांवर प्रकाश टाकला. “स्वामी विवेकानंदांचे विचार केवळ वाचण्यासाठी नसून ते आजच्या युवा पिढीने प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करणे काळाची गरज आहे,” असे आवाहन भादेकर यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य मुकेश तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अभाविप महानगर सहमंत्री सोहेल शेख,गौरव भोसले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम पार पडला.
