पिंपरी, दि. १६ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा )-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने वयोवृद्ध, महिला, दिव्यांग , इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात उस्फुर्त सहभाग नोंदविला. सकाळी ७.३० वाजतापासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून सुमारे सरासरी ५७.७१% मतदान झाले आहे तर
आज दि.१६ जानेवारी रोजी सकाळी १० पासून महापालिका हद्दीतील निश्चित केलेल्या ८ ठिकाणी सुरू होणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
*मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी*
८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयअंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.५६ टक्के मतदान झाले. तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात वाढ होऊन ते १६.३ टक्के इतके झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २८.१५ टक्के इतके झाले. त्यानंतर दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४०.५ टक्के मतदान पार पडले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५७.७१ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते.
*पिंपरी चिंचवड महानगपालिका प्रभागनिहाय मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे -*
प्रभाग क्र. १ – ६०.६१ %
प्रभाग क्र. २ – ६४.९१ %
प्रभाग क्र. ३ – ६०.९७ %
प्रभाग क्र. ४ – ५७.०८ %
प्रभाग क्र. ५ – ६१.५८ %
प्रभाग क्र. ६ – ५५.७२ %
प्रभाग क्र. ७ – ५८.३७ %
प्रभाग क्र. ८ – ६०.१९ %
प्रभाग क्र. ९ – ५६.९१ %
प्रभाग क्र. १० – ४९.५४ %
प्रभाग क्र. ११ – ५४.७१ %
प्रभाग क्र. १२ – ६५.१४ %
प्रभाग क्र. १३ – ५४.२७ %
प्रभाग क्र. १४ – ५३.४४ %
प्रभाग क्र. १५ – ५५.५६ %
प्रभाग क्र. १६ – ६२.४५ %
प्रभाग क्र. १७ – ६०.०४ %
प्रभाग क्र. १८ – ५६.१८ %
प्रभाग क्र. १९ – ४९.२२ %
प्रभाग क्र. २० – ५५.४२ %
प्रभाग क्र. २१ – ५६.७६ %
प्रभाग क्र. २२ – ६०.२८ %
प्रभाग क्र. २३ – ६३.३७ %
प्रभाग क्र. २४ – ६१.७२ %
प्रभाग क्र. २५ – ६०.४८ %
प्रभाग क्र. २६ – ५५.३० %
प्रभाग क्र. २७ – ६१.०१ %
प्रभाग क्र. २८ – ५४.८८ %
प्रभाग क्र. २९ – ५४.५९ %
प्रभाग क्र. ३० – ५४.२२ %
प्रभाग क्र. ३१ – ५२.०० %
प्रभाग क्र. ३२ – ५७.५९ %
मतदान केंद्रांवर सर्व मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, शौचालयांची सुविधा तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांसाठीही मतदानाच्या दिवशी विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या त्या मध्ये मतदारांचे मोबाईल जमा करून त्यांना टोकन क्रमांक देण्यात आले होते. यामुळे केंद्रावर मोबाईल घेऊन आलेल्या मतदारांना सुरक्षित मोबाईल जमा करून मतदान करता आले. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर कार्यालयाकडील अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका, महाविद्यालयातील स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व सुविधांमुळे दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्व मतदारांना सुलभ, सुरक्षित व सुरळीतरीत्या मतदानाचा हक्क बजावता आला आहे. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. याठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी घेतले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी अल मनार प्राथमिक व माध्यमिक शाळा, साई जीवन प्राथमिक विद्यालय, मास्टर माईंड, ग्लोबल इंग्लिश स्कूल यांसह कुदळवाडी, भोसरी आणि चिखली येथील मतदान केंद्रांवर जाऊन सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेची पाहणी केली. मतदारांना सुलभ मतदान करता येत आहे की नाही आणि महापालिकेकडून पुरवण्यात आलेल्या सुविधांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.
मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवन येथे कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेवून होते.
मुख्य निवडणूक निरीक्षक सुधांशू राय आणि निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली.
१६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता महापालिका हद्दीतील निश्चित केलेल्या ८ ठिकाणी सुरू होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तीला ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
