मतदान जनजागृती अभियान
व्हिंटेज कार रॅली व प्रदर्शन

Share this News

पिंपरी दि.९ (सिटीनामा वृत्तसेवा)
दि.१५ जानेवारी २०२६ रोजी होत असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानासाठी मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेच्या वतीने रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी शहरात भव्य विंटेज कार रॅली व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली जाणार असून, नागरिकांना ऐतिहासिक व दुर्मिळ कार आणि बाईक प्रत्यक्ष पाहण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

लिनिअर गार्डनपासून निगडीपर्यंत रॅली

ही रॅली पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथून सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. लांडेवाडी चौक, संत तुकाराम नगर, पिंपरी चौक, भाटनगर, चिंचवड, प्रेमलोक पार्क, आकुर्डी चौक, म्हाळसाकांत चौक मार्गे रॅली निगडी येथील नियोजित महापौर निवास मैदानात पोहोचणार आहे. तेथे रॅलीचा समारोप होऊन विंटेज वाहनांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

नागरिकांना सहभागाचे आवाहन

या रॅली व प्रदर्शनाच्या निमित्ताने नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *