– शिवतेज मित्र मंडळाचे आयोजन
चिंचवड दि.१९ (सिटीनामा वृत्तसेवा)
जय गणेश शिवतेज मित्र मंडळ सेक्टर १८ शिवतेज नगर चिंचवड, पुणे यांच्यातर्फे श्री.गणेश जयंतीचे औचित्य साधून शिवतेज व्याख्यानमालेचे भव्य आयोजन श्री गणेश मंदिर प्रांगण सेक्टर १८, शिवतेज नगर या ठिकाणी दि.१९ ते २१ जानेवारी पर्यंत रोज सायंकाळी ७.३० वाजेपासून करण्यात आले आहे.
सोमवार दि.१९ जानेवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांचे सामाजिक समरसता या विषयावर, मंगळवार दि.२० रोजी सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार भालचंद्र कोळपकर यांची हास्य मैफिल तर बुधवार दि.२१ जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर चे विश्वस्त, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान १० वे वंशज ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज यांचे अध्यात्म व पर्यावरण या विषयावर व्याख्यान होणार आहे.
गुरुवार दि.२२ जानेवारी रोजी श्री.गणेश जयंती निमित्ताने सकाळी १० वाजता पूजा होम हवन, दुपारी २ वाजता शिवतेज भजनी मंडळातर्फे भजने, दुपारी ४ वाजता ज्ञानाई भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ६.३० वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, रात्री ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता ह.भ.प.खंडू बापू मोरे चिखली गाव पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध वारकरी सांप्रदायिक भजन व महाप्रसाद होणार असून या सर्व आध्यात्मिक कार्यक्रमांचा व सुश्राव्य व्याख्यानांचा लाभ घेण्याचे आवाहन जय गणेश शिवतेज मित्र मंडळ व मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

