पुणे दि.१८ (सिटीनामा वृत्तसेवा)
‘शुद्ध आणि सात्विक सदभाव हा विश्व हिंदू परिषद कार्याचा पाया असून त्याद्वारे समाजातील सत्व टिकवून ठेवणे ही आपलीच जबाबदारी आहे, आणि त्यामुळे पूर्ण समाज सुरक्षित राहील’ हा महत्वपूर्ण
संदेश विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय मंदिर अर्चक पुरोहित आयाम प्रमुख व केंद्रीय सह मंत्री मा. अरुणजी नेटके यांनी दिला. प्रांत व्यापक बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. आपले कार्य खंड, प्रखंड स्तरावर निर्णय किती आवश्यक आहे आणि त्यासाठी कार्यकर्ता कसा असावा हेही त्यांनी गीतेतील एका श्लोकाचे उदाहरण देऊन सांगितले. बैठक नवीन मराठी शाळेचे सभागृह येथे आयोजित करण्यात आली यावेळी क्षेत्र मंत्री रामचंन्द रामुका, क्षेत्र धर्मप्रसार प्रमुख अजय निदलावार, प्रांत अध्यक्ष प्रा गजानन धरणे, पांडूरग राऊत, हेमंत हरहरे सौ माधवी संशी, ॲड सतिश गोरडे व नितीन वाटकर आदि उपस्थित होते. तसेच सर्व आयामांचे प्रांत प्रमुख, विभाग व जिल्हा मंत्री, तसेच जिल्हा संच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नवनियुक्त प्रांत अध्यक्ष प्राचार्य गजानन धरणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विश्व हिंदू परिषदेतील सर्व आयाम, रचना आणि कार्यपद्धती पाहून समाधान वाटल्याचे सांगितले. “सध्या अनेक प्रश्न समाजामध्ये आहेत, या सगळ्यावर उपाय कोण शोधणार हा प्रश्न आहे, पण आपले संघटन हेच त्यावर उत्तर आहे!” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नियमित प्रशिक्षणाचे अधोरेखित करून आपणही आगामी प्रशिक्षण वर्गामध्ये उपस्थित राहायचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी आपला संघ स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला बालपणापासूनचा प्रवास उलगडून दाखवला.
प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी हस्तिनापूर येथे झालेल्या केंद्रीय बैठकीतील वृत्त महत्त्वाचे निर्णय आणि आगामी कार्यक्रम याबद्दल माहिती सांगितली.
अरुण नेटके यांनी आगामी रामोत्सव कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन केले. भव्य शोभायात्रा समाजालाच काढू द्याव्यात, आपण रामोत्सव जास्त प्रमाणात ग्राम व वस्तीस्तरावर साजरा कसा होईल याकडे जास्त लक्ष द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्याकारीणी सदस्य व पालक हेमंत हरहरे यांनी संघशताब्दी निमित्त होणारे गृहसंवाद व हिंदू संमेलने व आगामी कार्यक्रम आणि त्यामध्ये आपला सहभाग कसा असावा यासंबंधी मार्गदर्शन केले.
प्रांतातील विविध आयामांद्वारे संघटन आणि आगामी कार्य नियोजन यासंबंधी वृत्त निवेदन करण्यात आले.
सर्व विभाग मंत्र्यांनीही विभागश: बैठकांनंतर आपापल्या विभागातील जिल्ह्यांचा संख्यात्मक आढावा सादर केला.मुंबई क्षेत्र मंत्री रामचंद्र रामुका यांनी केंद्रीय बैठकीत मान्य झालेले ठरावांची माहिती दिली, प्रांत सह मंत्री ॲड सतिश गोरडे यांनी परिषद क्षेत्र वर्ग, नितीन महाराज यांनी बजरंग शौर्य प्रशिक्षण वर्ग, प्रिंया रसाळ यांनी मातृशक्ती वर्ग, सौ सोनाली नाथ यांनी दुर्गा वाहिनी वर्ग व श्रीकांत पोतनीस यांनी विशेष संपर्क आयामाची माहिती दिली.
मुंबई क्षेत्र धर्मप्रसार प्रमुख मा. श्री. अजयजी निलदावार हेही प्रांत बैठकीमध्ये उपस्थित होते.
नवीन वर्षाच्या दैनंदिनीचे सर्व उपस्थित मान्यवर ॲड ललित झुनझुनवाला यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मातृशक्ती प्रांत संयोजिका सौ प्रियाताई रसाळ यांनी आचारपद्धती, विभाग सहमंत्री श्री. संतोष अनगोळकर यांनी सूत्रसंचालन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
