पुणे दि.१४ (सिटीनामा वृत्तसेवा)
संत शिरोमणी रविदास महाराजांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्याने संत गुरु रविदास विचार समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ पिंपरी चिंचवड यांचे वतीने संत रविदास मंदिर, गणेश तलाव, प्राधिकरण निगडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता संत रविदास महाराजांची निगडी चौक ते संत रविदास मंदिर गणेश तलाव प्राधिकरण पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक व कीर्तनकार ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे संत रविदास महाराजांवर कीर्तन होणार आहे त्यानंतर दुपारी ३ वाजता नवनिर्वाचित नगरसेवक व समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ होणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक संत गुरु रविदास विचार समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघ पिंपरी चिंचवड संत गुरु रविदास मंदिर , गणेश तलाव, प्राधिकरण निगडी पुणे यांनी केले आहे. याच दिवशी संत रविदास विचार समिती आयोजित जयंती सोहळ्यात ना.चंद्रकांत दादा पाटील व समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील होणार असल्याची माहिती दिली आहे.
