-विविध महिला संघटनांतर्फे निवेदन
चिंचवड दि.१४ (सिटीनामा वृत्तसेवा)
राज्यात वाढत्या लव्ह जिहाद व बळजबरीच्या धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर कायदा तातडीने संमत करावा, या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी निगडी येथील तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
मागील वर्षी शासनाने जीआर काढून समिती स्थापन केली; मात्र आजतागायत कायदा संमत न झाल्याने समाजात तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे. “समित्या, बैठका आणि आश्वासने पुरे झाली — आता ठोस कायदा हवा,” अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली.
अनेक मुलींना प्रेमाच्या आमिषाने जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करून बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना शासनाने विलंब करणे म्हणजे समाजाच्या भावना दुर्लक्षित करणे होय, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
“आता प्रतीक्षा नाही — कायदा हवाच!”
अशी ठाम मागणी करत अपर तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी पिंपरी-चिंचवड रणरागिणी, राष्ट्रसेविका समितीच्या सदस्या, शिंदे शिवसेना गटाच्या सुलभा रामभाऊ उबाळे निगडी, मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुनानगर, अष्टविनायक मंडळ पिंपळे गुरव, श्री संत तुकाराम महाराज महिला भजनी मंडळ श्रीक्षेत्र देहू, पंचरत्न महिला मंडळ सांगवी तसेच इतर हिंदू महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
